मराठीला वाचवायचे? आणि ते का बरे?
‘मराठी भाषेला वाचवा!’ अशा प्रकारची हाकाटी हल्ली केली जात आहे. या हाकाटीतले आवाहन जसे सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय नेतृत्वाला केलेले असते तसेच ते थेट लोकांनाही केलेले असते. त्यापुढे जाऊन, मराठी भाषा कशी वाचवायची याबद्दल लोकजागृती करणे, काही धोरण स्वीकारणे, आणि निरनिराळे नियम बांधणे अशाप्रकारचे कार्यक्रम आखले जातात. मराठी भाषा कशापासून वाचवायची याही प्रश्नाची विविध उत्तरे दिली जातात—इंग्रजीच्या किंवा …